कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रेमडिसीवीरचा काळा बाजार होतोय...| Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

नागपूर - सचिन वझे यांच्या पत्रात दोन कोटी आणि ५० कोटींचा उल्लेख आहे, हे गंभीर प्रकरण आहे. त्याची सीबीआय किंवा तत्सम एजंसीकडून चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं. रेमडिसीवीरचा काळा बाजार मागच्या लाटेतही झाला होता, तो या लाटेतही होतोय. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ज्या राज्यात लाट नाही तिथून रेमडिसीवीर घेतली पाहिजे. राज्य सरकारने लसीचं राजकारण थांबवावं. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पत्र पाठवले आहे. त्यात सर्व माहिती आहे. उत्तर प्रदेशापेक्षा जास्त लस महाराष्ट्राला मिळाली आहे. दोन दिवसांचं लॅाकडाऊन म्हणत सात दिवसांचे लॅाकडाऊन लादले, ही फसवणूक आहे. व्यापाऱ्यांचा उद्रेक सरकारने लक्षात घ्यायला हवा. समाज आणि सरकार एकमेकाविरोधात उभं राहणे चांगलं नाही, असे विरोधी पक्ष नेते आज येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
#DevendraFadnavis #Nagpur #Coronavirus #Remedicivir #Sachinvaze #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires